﻿योहाननी लिखेल पहिलं पत्र.
1.
आम्हीन जिवनना शब्दना बद्दल लिखं जे सुरवात पाईन व्हतं, जे आम्हीन ऐकेल शे, आम्हीन आमना डोयासघाई दखेल शे, अनी जे आम्हीन आमना हातसघाई तपाशी लिधं. 
ते जिवन प्रकट व्हयनं, ते आम्हीन दखेल शे, अनं त्यानी साक्ष आम्हीन देतस; ते सार्वकालिक जिवन पितानाजोडे व्हतं अनं आमले प्रकट व्हयनं ते तुमले बी सांगी राहीनुत; 
जे आम्हीन दखेल शे अनं ऐकेल शे ते तुमले बी यानाकरता सांगतस की, तुम्हीन बी आमनामा एकत्र ऱ्हावाले पाहिजे; आपली सहभागीता तर पितानासंगे अनी त्याना पोऱ्या येशु ख्रिस्त यानासंगे शे; 
आमना आनंद पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन आम्हीन हाई लिखी राहिनुत. 
जो संदेश आम्हीन त्याना पोऱ्याकडतीन ऐकेल शे तो तुमले ऐकाडतस; तो संदेश हाऊ शे की, देव प्रकाश शे अनी त्यानामा कसानाच अंधार नही शे. 
जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत; 
जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस. 
आमना मा पाप नही शे अस जर आम्हीन सांगत व्हसुत तर आम्हीन स्वतःले फसाडी राहीनुत, अनं आपलामा सत्य राहत नही. 
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी. 
आम्हीन पाप करं नही, अस जर आम्हीन सांगं, तर आपण परमेश्वरले खोटं ठरावतस अनी त्याना वचन आपलामा राहत नही. 
