﻿इब्री लोकसले पत्र.
1.
देव भुतकाळमा बराचदावं अनं येगयेगळा प्रकारतीन आपला पुर्वजससंगे संदेष्टासनाद्वारा बोलना, 
तो या शेवटला दिनसमा आपलासंगे आपला पोऱ्याद्वारा बोलेल शे, देवनी त्याले सर्व वस्तुसना वारीस करेल शे अनी त्यानाद्वारा त्यानी सर्व सृष्टी उत्पन्न करेल शे. 
हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना. 
जेवढ पोऱ्याले देवदूतसपेक्षा वारस हक्कतीन श्रेष्ठ नाव भेटेल शे, तेवढाघाई तो त्यासनापेक्षा जास्त श्रेष्ठ व्हयना. 
देवनी कोणता देवदूतले कधी अस सांगं; “तु मना पोऱ्या शे, आज मी तुले जन्म देयल शे” अस तो कोणताच देवदूतबद्दल बोलना नही अनी परत हाई, “मी त्याना पिता असा व्हसु, अनी तो मना पोऱ्या असा व्हई.” 
पण जवय देव आपला जेष्ठ पोऱ्याले जगमा धाडी त्या येळबद्दल तो असं म्हणस; “देवना सर्व दूत त्यानी आराधना करोत.” 
पण देवदूतसबद्दल देव अस सांगस, “तो आपला देवदूतसले हवा अनी आपला सेवकसले अग्नीज्वाला अस बनाडस.” 
परमेश्वर, पोऱ्याबद्दल तो अस म्हणस; “हे परमेश्वर तुना राज्य सदासर्वकाळ टिकी, तु लोकसवर न्यायीपणतीन राज्य करशी.” 
तु, जे चांगलं शे त्यावर प्रेम अनी जे वाईट शे, त्यानासंगे वैरी करेल शे, यामुये हे परमेश्वर, तुना परमेश्वरनी, तुना सोबतीसपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलना अभिषेक तुले करेल शे, 
तो आखो म्हणस; “हे परमेश्वर, तु सुरवातले पृथ्वीना पाया घाला, अनी आकाश तुना हातनघाई बनाडेल शे. 
ते नष्ट व्हई जाई, पण तु कायम राहशी, ते सर्व कपडानामायक झिजाई जाई, 
तु त्यासले सदरानामायक गुंडाळी टाकशी, अनी ते कपडानामायक बदली बी जातीन, पण तु तसाच राहशी, तु सर्वकाळ जिवतच ऱ्हाशी.” 
देवनी कोणता देवदूतबद्दल अस कधी म्हणं; “मी तुना शत्रुसले तुना पायखाल तुना पदासन करापावत तु मना उजवीकडे बैस.” 
तर देवदूत कोण शेतस? देवदूत देवनी सेवा करनारा आत्मा शेतस अनी तारण भेटणारा लोकसनी मदत कराकरता ते देवनी धाडेल शेतस. 
