﻿पौलनी लिखेल थेस्सलनीकरसले पहिलं पत्र.
1.
मी पौल, सिल्वान अनं तीमथ्य यानासंगे हाई पत्र लिखस, देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्तना लोकसले ज्या थेस्सलनीकरसनी मंडळीमा शेतस, तुमले कृपा अनं शांती मिळो. 
आम्हीन आमनी प्रार्थनामा तुमले याद करीसन कायम तुमना सर्वासकरता देवना उपकार मानतस. 
आपला देवबापसमोर तुमनं ईश्वासतीन करेल काम, प्रितीतीन करेल कष्ट, अनं आपला प्रभु येशु ख्रिस्तना आशामुये धरेल धीर यानं आम्हीन कायम स्मरण करतस. 
देवना प्रितीमाधला आमना भाऊ अनी बहिणीसवन, तुमनी व्हयेल निवड आमले माहितच शे. 
कारण आमनी सुवार्ता फक्त शब्दसतीन नही, तर सामर्थ्यतीन, पवित्र आत्मातीन अनं पूर्ण खरापणना निर्धारतीन तुमले सांगामा वनी. तसच आम्हीन तुमनासंगे कसा वागनुत, हाई तुमले माहित शे, हाई तुमना चांगला करता व्हतं. 
तुम्हीन फार संकटमा व्हतात तरी बी पवित्र आत्माना आनंदतीन वचन स्विकारीन आमनं अनं प्रभुनं अनुकरण करनारा व्हयनात; 
अस करीसन तुम्हीन मासेदोनिया अनं अखया प्रांतमा राहनारा सर्व ईश्वासणारासले आदर्श व्हयनात. 
मासेदोनिया अनं अखयामा तुमना कडतीन प्रभुना वचननी घोषणा व्हयेल शे; फक्त इतलंच नही तर देववरील तुमना ईश्वासनी बातमी सगळीकडे पसरेल शे; यामुये त्यानाबद्दल आमले काही सांगानी आवश्यकता नही. 
त्या लोके तुमनाबद्दल आमले सांगतस की, आम्हीन तुमनाकडे वनुत तवय तुम्हीन आमनं कसं स्वागत करं, तुम्हीन मुर्तिपाईन देवकडे कशा वळणात, अनी जिवत अनं खरा देवनी सेवा कराले लागनात, 
अनी त्याना पोऱ्या येशु ह्यानी स्वर्गमातीन येवानी वाट दखत ऱ्हा, त्या पोऱ्याले म्हणजे येशुले देवनी मरेल मातीन ऊठाडं अनं तो आपले परमेश्वर कडतीन येणारा क्रोधपाईन सोडवणारा शे. 
