﻿लूक.
23.
मंग ती सर्वी मंडळी ऊठीसन येशुले पिलातकडे लई गयात; 
अनी त्या त्यानावर असा आरोप ठेवाले लागनात की, हाऊ आपला यहूदी लोकसले भडकवतांना, रोमन सम्राटले कर देवाकरता मनाई करतांना अनी “मी स्वतः ख्रिस्त राजा शे, अस म्हणतांना आमले दखायना.” 
तवय पिलातनी त्याले ईचारं की, “तु यहूदी लोकसना राजा शे का?” येशुनी त्याले उत्तर दिधं, “तुम्हीन म्हणतस तसच.” 
तवय पिलातनी मुख्य याजकसले अनं लोकसनी गर्दीले सांगं, “माले हाऊ मनुष्यसमा काहीच दोष दखायना नही.” 
तरी त्या अधिकच जोर लाईन बोलनात, “ह्यानी गालीलपाईन सुरवात करीसन आठपावत सगळा यहूदीयामा शिक्षण दिसन लोकसले भडकायेल शे.” 
तवय पिलातनी हाई ऐकीन, “हाऊ माणुस गालीली शे का?” अस ईचारं; 
अनी तो हेरोदना राज्यमधला शे असं समजनं तवय त्यानी त्याले हेरोदकडे धाडी दिधं, कारण तो पण त्या दिनसमा यरूशलेममा व्हता. 
येशुले दखीन हेरोदले भलता आनंद व्हयना; कारण येशुबद्दल ऐकानंतर त्याले भेटावं अशी त्यानी बराच दिनपाईन ईच्छा व्हती, अनी त्याना हाततीन एखादा चमत्कार दखाले मिळी अशी त्यानी आशा व्हती. 
हेरोदनी त्याले बराच प्रश्न ईचारात; पण येशुनी काहीच उत्तर दिधं नही. 
मुख्य याजक अनं शास्त्री उभा राहीन त्यानावर गंभीर दोष लायी ऱ्हाईंतात; 
तवय हेरोदनी अनं त्याना शिपाईसनी येशुना धिक्कार अनं निंदा करीसन अनी सुंदर कपडा त्याना आंगमा घालीसन त्याले परत पिलातकडे धाडी दिधं. 
त्याच दिन पिलात अनं हेरोद ह्या एकमेकसना मित्र बनी गयात; कारण त्या पहिले एकमेकसना दुश्मन व्हतात. 
मंग पिलातनी मुख्य याजक, अधिकारी अनं लोकसले एकत्र बलायं, 
अनी सांग, “हाऊ माणुस लोकसले भडकावस म्हणीन याले तुम्हीन मनाकडे आणं; पण दखा, ज्या गोष्टीना आरोप तुम्हीन ह्यानावर ठेई राहीनात त्यानाबद्दल मी तुमनासमोर ह्यानी चौकशी करावर माले ह्या माणुसमा काहीच दोष सापडना नही; 
हेरोदले पण यानामा काहीच दोष सापडना नही; म्हणीन त्यानी त्याले आमनाकडे परत धाडी देयल शे; अनी दखा, ह्यानी मरणदंडना योग्य असं काहीच करेल नही. 
यामुये मी याले फटका मारीसन सोडी देस.” 
कारण त्याले सणमा त्यासनाकरता एकजणले सोडाना अधिकार राहे. 
पण सर्वासनी एकच आवाजमा वरडीसन सांगं, “ह्याले मारी टाका! अनी आमनाकरता बरब्बाले सोडी द्या!” 
ह्या बरब्बाले शहरमा व्हयेल दंगा अनं खून यामुये कैदखानामा टाकेल व्हतं. 
येशुले सोडी देवाणं हाई ईच्छातीन पिलातनी त्यासनासंगे परत बोलणं करं. 
तरी त्या परत वरडिन बोलनात “त्याले क्रुसखांबवर खिया! क्रुसखांबवर खिया!” 
पिलात त्यासले तिनदा बोलना, “का बरं? त्यानी कोणता गुन्हा करेल शे? त्यानामा मरणदंड व्हवासारखा काहीच दोष माले सापडना नही; म्हणीन मी याले फटका मारीसन सोडी देस.” 
पण याले क्रुसखांबवर खियाच असा त्यासनी जोरमा वरडीन हट्ट धरा; अनी त्या वरडामुये शेवट त्यासले यश मिळनं. 
तवय त्यासनी मांगेलप्रमाणे कराकरता पिलात सहमत व्हयना. 
मंग दंगा अनं खून यामुये कैदमा टाकेल ज्याले त्यासनी मांगेल व्हतं त्याले त्यानी सोडी दिधं अनी येशुले त्यासना मर्जीप्रमाणे कराकरता सोपी दिधं. 
मंग त्या येशुले लई जाई राहींतात तवय कोणी एक शिमोन कुरेनेकर नावना माणुस शहरकडतीन ई राहींता त्याले त्यासनी धरं अनी त्याना खांदावर क्रुसखांब दिसन त्याले येशुना मांगे तो उचली लई जावाले सांगं. 
तवय त्यानामांगे लोकसनी अनी ज्या बाया त्यानाकरता रडीसन शोक करी राहींत्यात त्यासनी मोठी गर्दी चाली राहींती; 
येशु त्यासनाकडे वळीन बोलना, “अहो, यरूशलेमना पोरीसवन, मनाकरता रडु नका, तर स्वतःकरता अनी तुमना लेकरं बाळसकरता रडा. 
असा दिन येतीन की जवय लोके सांगतीन, ‘धन्य शेतस त्या वांझ, अनी त्या उदरे ज्यासनी जन्म नही दिधा, अनी त्या स्तन ज्यासनी कधीच दुध पाजं नही!’ 
त्या येळले त्या डोंगरसले म्हणतीन ‘आमनावर पडा!’ अनं टेकड्यासले म्हणतीन ‘आमले झाका!’ 
जर हिरवा झाडले अस करतस तर वाळेल झाडनं काय व्हई?” 
तवय येशुसंगे दुसरा दोन जणसले ज्या अपराधी व्हतात त्यासलेपण मृत्युदंडनी शिक्षा देवाले लई गयात. 
नंतर त्या कवटी म्हणतस ती जागावर वनात, तवय तठे त्यासनी येशुले अनी त्या अपराधीसले, एकले त्याना उजवीकडे अनं दुसराले त्याना डावीकडे अस त्यासले क्रुसखांबवर खियं. 
तवय येशु बोलना, “हे बाप, यासले क्षमा कर! कारण ह्या काय करतस हाई ह्यासले समजत नही.” “नंतर त्यासनी चिठ्या टाकीसन त्याना कपडा वाटी लिधात.” 
लोके तठे जोडेच उभा राहीन दखी राहींतात; आठपावत की अधिकारी त्याले चिडाईसन बोली राहींतात, “त्यानी दुसरासले वाचाडं; जर हाऊ देवपाईन निवडेल ख्रिस्त शे, तर त्यानी स्वतःले वाचाडाले पाहिजे!” 
शिपाईसनी जोडे ईसन, त्याले आंब दिसन, त्यानी अशी थट्टा करी, 
अनी सांगं, “तु यहूदी लोकसना राजा व्हशी तर तु स्वतःले वाचाड!” 
“हाऊ यहूदीसना राजा शे” असा एक लेखही त्यानावर व्हता. 
क्रुसखांबवर खिळेलस पैकी एक अपराधी त्यानी निंदा करीसन बोलना, “तु ख्रिस्त शे ना? तर स्वतःले अनी आमले वाचाड!” 
पण दुसरा अपराधी त्याले धमकाडीसन बोलना, “तु देवले सुध्दा भिंत नही का? तुले बी तिच शिक्षा व्हई राहीनी. 
आपली शिक्षा तर योग्यच शे; कारण आपण आपला कर्मसनं योग्य फळ भोगी राहीनुत; पण यानी काहीच अयोग्य करेल नही शे.” 
मंग तो बोलना, “हे येशु, जवय तु तुना राजाधिकारमा येशी तवय मनी आठवण कर!” 
येशु त्याले बोलना, “मी तुले खरंखरं सांगस, तू आज मनासंगे सुखलोकमा ऱ्हाशी.” 
मंग जवळजवळ दुपारना बारा वाजापाईन तिन वाजेपावत सूर्यप्रकाश नाहीसा व्हईन सर्वा देशमा अंधार पडना; 
अनी मंदिरमधला पडदा मधोमधमा फाटीन त्याना दोन तुकडा व्हईनात. 
तवय येशु, मोठा आवाजमा वरडीन बोलना, “हे बापा! मी मना आत्मा तुना हातमा सोपी देस!” अस बोलीसन तो मरना. 
तवय जे व्हयनं ते दखीसन शिपाईसना अधिकारीनी देवना गौरव करीसन सांगं, “खरोखर हाऊ माणुस नितीमान व्हता!” 
तवय सर्व लोकसनी गर्दी हाई दृश्य दखाकरता एकत्र जमेल व्हती, जे काही व्हयनं ते दखीसन त्या छाती ठोकीन शोक करत परत गयात. 
तवय त्याना वळखीना सर्वाजन अनं ज्या बाया त्यानामांगे गालीलमाईन येल व्हत्यात, त्या हाई दखत दूर उभ्या राहेल व्हत्यात. 
यहूदीसना अरिमथाई गावमधला योसेफ नावना कोणी एक व्यक्ती व्हता, तो न्यायसभाना सदस्य राहीन सज्जन अनी धार्मीक माणुस व्हता. 
तो यहूदी लोकसनं काम अनं निर्णय यासले सहमत नव्हता अनी तो देवना राज्यनी वाट दखी राहींता. 
त्यानी पिलातकडे जाईसन येशुनं मृतदेह मांगा. 
नंतर त्यानी तो मृतदेह खाल उतारीसन तागना कपडासमा गुंढाळा अनं खडकमा खोदेल कबरमा जाईन ठेवं, ह्या कबरमा अजुन कोणलेच ठेयेल नव्हतं. 
तो तयारी कराना दिन व्हता; अनी शब्बाथ दिननी सुरवात व्हणार व्हती. 
गालीलमाईन येशुसंगे येल बायासनी योसेफमांगे ईसन ती कबर दखी अनं त्याना शरीर कसं ठेवं हाई बी दखं. 
मंग त्यासनी परत घर जाईसन मृतदेहले लावाकरता मसाला अनं सुगंधी द्रव्य तयार करं. शब्बाथ दिननी आज्ञाप्रमाणे त्यासनी आराम करा. 
