﻿आमोस.
1.
तकोवा गावमधला मेंढपाळ, आमोस यासना ह्या वचनं, यहूदासना राजा उज्जीया अनी योवाशाना पोऱ्या, इस्राएलना राजा यराबाम याना दिनसमा, भूकंपना दोन वरीस पहीले इस्राएलना विषयमा ज्या वचनं दृष्टांत पाईन त्याले भेटनी ती हाई शे. 
तो बोलना; सीयोनमाईन परमेश्वर गर्जना करी, तो यरुशेलममाईन आपला शब्द बोली. मेंढपाळसनी कुरणे शोक करतीन, अनी कर्मेलना माथा सुकाई जाई. 
परमेश्वर अश म्हणस, “कारण दिमिष्कना तिन काय चारी अपराधसबद्ल, मी शासन करापाईन मांगे फिराव नही. कारण त्यासनी गिलादले मळणी कराना लोखंडी अवजारघाई मारेल शे. 
मी हजाएलना घरमा इस्तव धाडसू; अनी तो इस्तव बेन-हदादना राजवाडासले जाळी टाकी. 
मी दिमिष्कना येवाना वाटना दार मोडी टाकसू, अनी बेथ-ऐदेनना घरमाईन राजदंड धरणारा अनं आवेनना गुफासमा राहणारा राजा अरामी लोके कीर आठे नगरमा जातीन.” अश परमेश्वर म्हणस. 
अनी परमेश्वर अश सांगस, “गज्जाना तीन काय पण चार अपराध व्हयना म्हणीन त्यासले शिक्षा करापाईन मी मांगे फिराव नही. कारण त्यासनी सगळा लोकसले गुलाम म्हणीन लि गयात, ह्या करता की त्यासले अदोमसना हातमा देवानं. 
म्हणीन मी गज्जाना भितवर इस्तव धाडसु. अनी हाऊ इस्तव त्याना किल्ला नष्ट करी. 
मी अश्दोदमा राहणारा लोकसले अनी अश्कोलोन राजदंड धरणारा लोकसले नष्ट करसू. एक्रोनना विरोधमा मी हात चालाडसू. अनी पलिष्टसना उरेल लोके मरतीन.” अश परमेश्वर देव सांगस. 
परमेश्वर अश म्हणस, “सोराना तीन काय पण चार अपराध व्हयना म्हणीन मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही. कारण त्यासनी सर्वा लोकसले अदोमसना हातमा दिधं अनी त्यासना भाऊससंगे करेल करार त्यासले याद राहिनी नही. 
म्हणीन सोराना तटबंदीवर मी इस्तव धाडसू अनी तो त्यासना किल्ला नष्ट करी.” 
परमेश्वर अश म्हनस, “ अदोमना तिनी अपराधसबद्दल मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही. कारण अदोमनी तलवार लिसन त्यासना भाऊसना पाठलाग करा. अनी त्यानी सर्वा त्याना दयाळूपना काढी टाका. त्याना संताप कायम राही. अनी त्यानी आपला संताप कायम बनाडी ठया. 
म्हणीन मी तेमान शहरवर इस्तव धाडसु, ती बस्राना किल्ला खाई टाकी.” 
परमेश्वर अश म्हणस, “अम्मोनना संतानसना तीन काय पण चार अपराध व्हयना मी शिक्षा करापाईन फिराव नही. कारण गिलादना भागमां गर्भवतीसले फाडी टाकं, ह्या करता की आपला देशना सीमासना विस्तार व्हवाले पाहीजे. 
म्हणीन मी राब्बाना तटबंदीले इस्तव लावसू, त्यासनावर युध्दना दिनले आरडाओरड व्हत असताना, अनी वावटळीना दिनले वादळघाई, ती त्यानं किल्ला खाई टाकी. 
अनी त्यासना राजा अनं त्यासनासंगे त्यासना सर्वा सरदार एकसंगे पकडाई जातीन.” अश परमेश्वर सांगस. 
