﻿उत्पती.
9.
मंग देव नोहा अनं त्याना पोऱ्यासले आशिर्वाद दिसन बोलना, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा अनी पृथ्वी व्यापी टाका. 
पृथ्वीवरना सर्व पशु, आकाशमाधला सर्व पक्षी, भुमीवर रांगनारा सर्व प्राणी अनं समुद्रामाधला सर्व मासा यासले तुमना भय अनं धाक राही; त्या तुमना स्वाधीन करेल शेतस. 
सर्व संचार करनारा प्राणी तुमना अन्न व्हतीन; जसं तुमले हिरवा वनस्पती देयल शेतस त्यानाप्रमाणे सर्व काही आते तुमले देस. 
पण मासना जिवन रक्त शे, म्हणीन रक्तनासंगे मास खावानं नही. 
मी नक्कीच तुमनं रक्त म्हणजे तुमना जीवना हिसाब लिसु; सर्व पशु अनं मनुष्य दोन्हीसघाई हिसाब लिसु, मनुष्यना प्राणना बदला प्रत्येक कडतीन लिसु. 
जो कोणी मनुष्यना रक्तपात करी तेना रक्तपात मनुष्यकडीन व्हई; कारण देवनी मनुष्यले आपला प्रतिरूपमा बनाडेल शे. 
तुम्हीन फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृध्दी करा, तिनावर बहुगुणित व्हा." 
देव नोहाले अनं त्यानासोबत त्याना पोऱ्यासले बोलना, 
"मी तुमनासंगे अनं तुमनानंतर तुमना संतानना संगे करार करी ठेवस. 
त्यानाप्रमाणे तुमनासोबत ज्या सजीव प्राणी शेतस, म्हणजे तुमनासोबत तारूमाईन बाहेर येल पक्षी, ग्रामपशु अनं पृथ्वीवरना बाकी सर्वा प्राणी यासनासंगे बी मी करार करी ठेवस. 
तुमनासंगे हाऊ करार करी ठेवस की, परत जलप्रलमा जीव नाश व्हवावुत नही, अनी पृथ्वीना नाश करनारा जलप्रलय परत कधीच व्हवावु नही. 
देव बोलना, मनामा अनी तुमनामा त्यानाप्रमाणे तुमनासंगे राहेल सर्वा सजीव प्राणीसमा पिढ्यानपिढा, युगानुयुग राहनारा जो करार मी करी ऱ्हायनु शे त्यानं हाई चिन्ह शे. 
मी ढगमा धनुष्य ठेयल शे, तो पृथ्वीना अनं मनासोबत व्हयेल करारना चिन्ह राही. 
मी पृथ्वीना वर ढग पसारसु तवय त्यामा मेघधनुष्य दखाई, 
तवय मनामा अनी तुमनामा अनं सर्वा देहधारी सजीव प्राणी यासनामा व्हयेल करार मी आठवसु, अनी यानापुढे सर्वा देहधारीसना नाश व्हई अशा जलप्रलय व्हवावु नही. 
धनुष्य ढगमा दखाई ते दखीसन मनामा अनी पृथ्वीवरना सर्वा सजीव प्राणीसमा व्हयेल युगानुयुग करेल करारनी माले आठवन राही. 
देव नोहाले बोलना, मनामा अनं पृथ्वीना सर्वा प्राणी यासनामा जो करार मी करी ठेयेल शे त्यानं हाई चिन्ह शे." 
नोहाना पोऱ्या तारूमाईन बाहेर निंघनात त्यासना नावे शेम, हाम अनं याफेथ अश व्हतात; हाम हाऊ कनानना बाप व्हता. 
ह्या तीन नोहाना पोऱ्या; यासनापाईन पृथ्वीमा लोकसना विस्तार व्हयना. 
नोहा जो शेतकरी व्हता, तो पहिला माणुस व्हयना ज्यानी द्राक्षमळा लावा. 
तो द्राक्षरस पिसन मस्त व्हयना अनी आपला तंबुमा उघडानागडा व्हईसन पडना. 
तवय कनानना बाप हाम यानी आपला बापले उघडा नंगा दखीसन आपला दोन्ही भाऊ ज्या बाहेर व्हतात त्यासले हाई सांगं. 
तवय शेम अनं याफेथ यासनी कपडा आपला खांदावर लिसन अनं पाठमोरा व्हईसन आपला बापनी नग्नता झाकी; त्यासना तोंड पाठमोरा व्हतात म्हणीन आपला बापनी नग्नता त्यासले दिसनी नही. 
द्राक्षरसना गुंगीमाईन सावुध व्हवावर आपला धाकला पोऱ्यानी काय करं हाई नोहाले समजनं. 
तो बोलना, कनान शापित व्हई, तो आपला भाऊसना दाससना दास व्हई. 
तो बोलना, शेमाचा देव यहोवा धन्य! कनान त्याना दास व्हई. 
देव याफेथना विस्तार करी; तो शेमना तंबुमा राही; अनी कनान त्याना दास व्हई. 
नोहा जलप्रलय व्हवानंतर तिनशेपन्नास वरीस जगना. 
नोहा जोडेजोडे नऊशेपन्नास वरीस जगना, मंग तो मरण पावना. 
